आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये चौथ्यांदा एकत्रित जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. सप्टेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,62,712 कोटी रुपये जमा झाला. यामध्ये CGST 29,818 कोटी, SGST 37,657 कोटी, IGST 83,623 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 41,145 कोटींसह) आणि cess 11,613 कोटी (माल आयातीवर गोळा केलेल्या 881 कोटींसह) आहे. नियमित सेटलमेंटनंतर सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल, CGST साठी 63,555 कोटी रुपये आणि SGST साठी 65,235 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2023 मधील हा महसूल मागील वर्षी याच महिन्यात जमा झालेल्या महसुलापेक्षा 10% जास्त आहे. (हेही वाचा: Kerala Variety Farmer Video: शेतकऱ्याचा स्वॅग! बाजारात भाजीपाला विकण्यासाठी आला अलिशान Audi A4 कारमधून, व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)