एप्रिलमधील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. गेल्या महिन्यात सरकारचे जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये होते, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान एकाच दिवसात सर्वाधिक संकलनाचा विक्रमही झाला. 20 एप्रिल रोजी 9.8 लाख व्यवहारांमधून 68,228 कोटी रुपयांचा कर जमा झाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. मात्र यावेळी हा विक्रम मोडीत निघाला. एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन यापेक्षा 19,495 कोटी रुपये अधिक होते. मार्चमध्ये जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपये होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)