विमान कंपनी गो फर्स्टची उड्डाणे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली आहेत. गो फर्स्ट एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ऑपरेशनल कारणांमुळे, 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत गो फर्स्टची नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, हे कळविण्यास आम्हाला खेद वाटतो.’ फ्लाइट रद्द झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘आम्ही जाणतो की फ्लाइट रद्द केल्याने तुमच्या प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि आम्ही सर्व शक्य सहाय्य देण्यास वचनबद्ध आहोत. कंपनीने तात्काळ निराकरण आणि ऑपरेशन्सच्या पुनरुज्जीवनासाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनी लवकरच बुकिंग पुन्हा सुरू करणार आहे. (हेही वाचा: Google For India 2023: Google ची मोठी घोषणा, पुढील वर्षात भारतात लॉंच होईल Pixel स्मार्टफोन)
Due to operational reasons, Go First flights until 30th November 2023 are cancelled. pic.twitter.com/SRCPF05tqJ
— ANI (@ANI) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)