Google For India 2023: Google ची मोठी घोषणा, पुढील वर्षात भारतात लॉंच होईल Pixel स्मार्टफोन
Google Pixel (Photo Credits: Google)

Google For India 2023: Google चे डिव्हाइसेस आणि सेवांचे वरिष्ठ उपाध्यक्ष, Google for India कार्यक्रमात गुरूवारी माहिती दिली आहे की,  Google पिक्सेल 8 स्मार्टफोन भारतात तयार करेल, जे भारतीय बाजारपेठेत आणि परदेशात विकले जातील. यासाठी गुगल आंतरराष्ट्रीय करार निर्मात्यांसोबत भागीदारी करेल असेही ते म्हणाले. Google च्या डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह म्हणाले की, Google येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात पिक्सेल स्मार्टफोनचे उत्पादन आणि असेंबलिंग सुरू करेल.

यानंतर भारतीय वापरकर्त्यांना 2024 मध्ये मेड इन इंडिया पिक्सेल 8 फोन मिळेल. कंपनीचे उद्दिष्ट देशातील विद्यमान पिक्सेल 8 स्मार्टफोनसह स्थानिक उत्पादन सुरू करण्याचे आहे आणि आतापासून ते निर्यात करण्याची आशा आहे.

Google चे रिक ऑस्टरलो या कार्यक्रमात म्हणाले, भारतातील पिक्सेल उपकरणांची मागणी पूर्ण करण्यासाठी आमचे उत्पादन वाढवण्याच्या दिशेने हे एक प्रारंभिक पाऊल आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुगलच्या मेक इन इंडिया वचनबद्धतेच्या दिशेने हा एक मोठा निर्णय आहे. पिक्सेल स्मार्टफोन भारतात बनवण्याचा निर्णय भारतीय ग्राहकांसाठी निश्चितच चांगला आहे. याचाच अर्थ आता देशात पिक्सेल स्मार्टफोन पूर्वपिक्षा अधिक परवडणारे असतील आणि त्यांची | उपलब्धताही सुलभ होईल. याशिवाय भारतात नोकच्या निर्माण होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.