सापाचं विष पुरवठ्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री Maneka Gandhi यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये बिग बॉस विजेता आणि युट्युबर एल्विश यादव याचंही नाव आले आहे. दरम्यान एल्विशने हे आरोप फेटाळले आहेत. "हा वन्यजीव गुन्हा आहे आणि आरोपींना 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे. कोब्रा त्यांचे विष गमावल्यावर मरतात. विष त्यांना अन्न पचन करण्यात मदत करते. विषाशिवाय ते अन्न पचवू शकत नाहीत. खूप कमी कोब्रा आणि अजगर देशातच राहिले आहेत. सरकारने त्यांना शेड्यूल 1 मध्ये ठेवले आहे. त्यांना पकडणे हा मोठा गुन्हा आहे, असे मनेका गांधी यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. Snake Venom: सर्पदंशामधून विषाने नशा केली जाऊ शकते का? जाणून घ्या या Drug Addiction ची लक्षणं, साईड इफेक्ट्स.
पहा ट्वीट
#WATCH | On FIR against Elvish Yadav in snake venom case in UP, BJP MP and founder & Chairperson of People for Animals, Maneka Gandhi says "About a week ago a raid was conducted in Mathura, UP, where 8 people were found with 8 snakes. These people revealed that they were part of… pic.twitter.com/qI29xvAUKP
— ANI (@ANI) November 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)