टेकक्रंचच्या (Techcrunch) एका अहवालानुसार, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्क्सना सरकारच्या 'तथ्य-तपासणीवर' (Fact-Checking) अवलंबून राहणे आवश्यक असलेल्या कायद्यात भारताने सुधारणा केली आहे. अहवालानुसार, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित किंवा शेअर करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी सरकारने आज आपल्या आयटी (IT) कायद्यात सुधारणा केली. सोशल मीडिया नेटवर्क्सना सरकारच्या 'कोणत्याही गोष्टी'बाबत दिशाभूल करणारी माहिती शेअर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आयटी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. सरकारने म्हटले आहे की माहितीची सत्यता निश्चित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता नवी दिल्लीच्या स्वतःच्या तथ्य-तपासणी युनिटवर अवलंबून राहावे लागेल. (हेही वाचा: Online Betting Advisory: भारतात ऑनलाईन बेटिंग गेम अॅपवर बंदी येण्याची शक्यता; सरकारने घेतला मोठा निर्णय)
JUST IN - India amends law requiring Facebook, Twitter, and other social networks to rely on government's "fact-checking" — Techcrunch
— Disclose.tv (@disclosetv) April 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)