Kuno National Park मध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू; आठवडाभरातील दुसरी घटना

नरेंद्र मोदी यांच्या बर्थ डेचं औचित्य साधत या चित्त्यांना भारतामध्ये आणले होते आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतातील मध्य प्रदेशात सोडण्यात आले होते.

Kuno National Park मध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू; आठवडाभरातील दुसरी घटना
African Cheetahs प्रतिकात्मक प्रतिमा (PC - pixabay)

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये चित्त्यांमधील अजून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (14 जुलै) अजून एक म्हणके आठव्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच 'दक्ष' चित्त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान 27 मार्चला नामीबियाई मध्ये आणलेल्या पहिल्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्याला किडनीचा आजार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मागील महिने सातत्याने होणारे हे मृत्यू चिंतेचा विषय बनले आहेत. फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांनादेखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. नक्की वाचा: Supreme Court On Cheetah Death: कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, इतर अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा दिला सल्ला 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2023 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).