Japan Earthquake: गुरुवारी सकाळी जपानच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दोन शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, पहिला भूकंप 6.9 रिश्टर स्केलचा होता, त्यानंतर दुसरा भूकंप 7.1 रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेट क्युशूच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे 30 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या हालचालीमुळे, जपान हवामान संस्था (JMA) ने सुनामीचा इशारा जारी केला आहे.न्यूज एजन्सी रॉयटर्सने जपानच्या सरकारी टीव्ही चॅनल एनएचकेचा हवाला देत म्हटले आहे की, क्युशूच्या मियाझाकी प्रांतात 20 सेंटीमीटर उंच लाटा यापूर्वीच पाहिल्या गेल्या आहेत. त्सुनामीची उंची 1 मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जपानच्या हवामान संस्थेने 'एक्स' वर सांगितले की, सुनामीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा उठेपर्यंत लोकांनी समुद्रात जाऊ नये किंवा किनाऱ्याजवळ जाऊ नये.हेही वाचा:  Earthquake in Uttarakhand: उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंपाचे धक्के जाणवले, तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 मोजली गेली

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)