DMK MP Gaumutra State Remark: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने आणलेली विधेयके आणि महागाई, बेरोजगारी आणि सार्वजनिक हिताच्या इतर मुद्द्यांवर भविष्यातील रणनीती यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी चर्चा केली. यावेळी द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार एस, देशातील जनतेने विचार केला पाहिजे की या भाजपची ताकद केवळ हिंदी मध्यवर्ती राज्यांमध्ये निवडणुका जिंकणे ही आहे, ज्यांना आपण सामान्यतः 'गौमूत्र' राज्य म्हणतो. सेंथिल पुढे म्हणाले की, भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. काश्मीरप्रमाणेच भाजप दक्षिण भारतातील राज्यांचेही केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्याचा धोका नक्कीच आहे. कारण ते ही राज्ये जिंकू शकत नसतील तर ते, या राज्यांना केंद्रशासित प्रदेश बनवून राज्यपालांमार्फत राज्य करू शकतात. (हेही वाचा: Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Winter Session of Parliament | DMK MP DNV Senthilkumar S says "...The people of this country should think that the power of this BJP is only winning elections mainly in the heartland states of Hindi, what we generally call the 'Gaumutra' states..." pic.twitter.com/i37gx9aXyI
— ANI (@ANI) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)