धुळे पोलीस मॉक ड्रिल करत असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ला झाला तर काय करायचे? यासाठी सराव म्हणून पोलिसांनी एक मॉक ड्रिल आयोजन केले. त्यासाठी नकली दहशतवादी तयार केले. परंतू, बुरखा घातलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या हालचाली पाहून लहान मुले रडायला लागली. त्यामुळे संतापलेल्या एका नागरिकाने थेट जाऊन नकली दहशतवादी झालेल्या व्यक्तीला कानाखाली लगावली. हा नागरिक नकली दहशतवाद्याला कानाखाली लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)