दिल्लीमध्ये पाणी संकटावरून उपोषणाला बसलेल्या मंत्री Atishi यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. हरियाणा सरकार कडून त्यांनी 100 मिलियन गॅलन प्रति दिन पाण्याची मागणी केली आहे. सध्या त्यांना Lok Nayak Jai Prakash (LNJP) Hospital मध्ये हलवण्यात आले आहे. मागील 5 दिवसांपासून त्या उपोषणाला बसल्या आहे. आप नेते संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशी मागील 5 दिवसांपासून उपोषणावर असल्याने काहीही न खाल्ल्याने त्यांची शूगर आणि बीपी खालावली असून ketone ची पातळी वाढली आहे. अतिशी या दिल्ली सरकार मध्ये जलमंत्री आहेत. Delhi Water Crisis: दिल्लीमध्ये अभूतपूर्व जलसंकट; जलमंत्री, AAP नेता अतिशी यांचे उपोषण. 

AAP leader Atishi हॉस्पिटल मध्ये

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)