दक्षिण-पश्चिम दिल्लीत एका पाच वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजारच्या 14 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. गुरुवारी ही घटना घडली. यावेळी मजूर असलेले पिडीत मुलीचे आई-वडील कामावर गेले होते आणि मुलगी दुपारी घरी एकटी होती. मुलीवरील अत्याचाराची माहिती मिळताच मुलीला तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि तिच्या पालकांच्या उपस्थितीत तिचे समुपदेशन करण्यात आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 65 (2) (अल्पवयीन मुलीवर बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाला ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. हा मुलगा पिडीत मुलीच्या शेजारी राहत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा: Sikkim Sexual Harassment: दिव्यांग महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक)
दिल्लीत 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार-
Delhi Shocker: 5-Year-Old Girl Raped by 14-Year-Old Boy in Southwest Delhihttps://t.co/RUvmOXsYE8 #Delhi #DelhiCrimeNews
— LatestLY (@latestly) August 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)