छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील एका शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी मुलींनी पिण्यास पाणी मागितले असता, त्यांना मूत्र पिण्याची सूचना देण्यात आली. वड्राफनगरच्या फुलीदुमर येथील सरकारी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने तहानलेल्या अल्पवयीन शाळेतील मुलींना पाण्याऐवजी लघवी प्यायला सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधाच्या गोळ्या दिल्या जात होत्या, मात्र शाळेत पाण्याची सोय नव्हती. शाळेत पाणी नसल्याचे विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांना सांगितल्यावर ते संतप्त झाले. त्यांनी मुलींना नाल्यातून पिण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी नकार दिल्यावर त्यांनी चिडून लघवी पिण्यास सांगितले.

त्यानंतरत्यानंतर ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी रेमिगियस एक्का यांनी मुख्याध्यापक रामकृष्ण त्रिपाठी यांना निलंबित करून या घटनेचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी या कृत्याचा निषेध केला आणि हे लाजिरवाणे असल्याचे म्हटले. (हेही वाचा: Uttarakhand Shocker: तीन अल्पवयीन मुलांनी शाळेच्या आवारात चार वर्षाच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न)

शाळेतील तहानलेल्या विद्यार्थिनींना मुख्याध्यापकाचा लघवी पिण्याचा सल्ला-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)