Chhattisgarh School Holiday on January 22: अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात छत्तीसगड सरकारने मोठी घोषणा केली आहे. शालेय शिक्षण मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांनी सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 22 जानेवारीला बंद राहतील. शालेय शिक्षण मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांना पत्र लिहून राज्यात सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाबाबत राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. छत्तीसगड हे भगवान श्री राम यांचे मातृ जन्मस्थान (श्री रामाचे आजोळ) आहे. या दिवशी येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्तीसगड सरकारने यापूर्वीच राज्यात 22 जानेवारी हा ड्राय डे म्हणून घोषित केला आहे. खुद्द मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी 22 जानेवारीला राज्यात दारूची दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली होती. प्रभू रामाची आई कौशल्या या छत्तीसगडच्या होत्या. त्यामुळेच छत्तीसगडमध्ये एका भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. अयोध्येमधील अभिषेक सोहळ्यासाठी छत्तीसगडहून खास तांदूळ पाठवण्यात आला आहे. हा तांदूळ रामलल्ला अर्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)