छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कांकेर जिल्ह्यातील पंखजूर येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या Samsung S23 हा फोन जलाशयात पडला होता. हा फोन शोधण्यासाठी या अधिकाऱ्याने जलाशयातून तब्बल 21 लाख लिटर पाणी बाहेर काढले. इतक्या पाण्याची नासाडी केल्यानंतर अखेर अधिकाऱ्याचा मोबाईल सापडला. या प्रकरणी आता एक सरकारी अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून एका अधिकाऱ्याच्या पगारातून पैसे कापले जाणार आहे. राजेश विश्वास या अधिकाऱ्याचा फोन जलाशयात पडला होता. त्यांने हे पाणी शेतीसाठी चांगले नसल्याचे कारण सांगत वरिष्ठांची परवानगी घेत जलाशय रिकामी केला होता.
पाहा ट्विट -
#Chhattisgarh के अंतागढ़ में फूड इंस्पेक्टर ने अपना मोबाइल खोजने के लिए बहा दिया परलकोट जलाशय का 21 लाख लीटर पानी!
फोन मिल गया फूड इंस्पेक्टर का कहना है - उन्होनें कुछ गलत नहीं किया, वहीं मंत्री @amarjeetcg कार्रवाई की बात कह रहे है।@ZeeMPCG @mohitsinha75 @RupeshGuptaReal pic.twitter.com/c0qcPpOUrd
— कुलदीप नागेश्वर पवार Kuldeep Nageshwar Pawar (@kuldipnpawar) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)