Chennai Rains: तामिळनाडूमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचू शकते. या पावसाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमधील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चेन्नईच्या वेलाचेरी येथील रहिवाशांनी चक्क फ्लायओव्हरवर त्यांच्या कार पार्क केल्या आहेत. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पुलाच्या बाजूला गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत.
आज पहाटे 5.30 वाजता आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. पुढील दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. अशात पावसामुळे गाड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून लोकांनी त्यांच्या गाड्या चक्क फ्लायओव्हरवर पार्क केल्या. (हेही वाचा: Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव)
चेन्नई नागरिकांनी फ्लायओव्हरवर पार्क केल्या आपल्या कार-
#velachery flyover parking started again #ChennaiRains pic.twitter.com/3QFQZoVi5C
— Varun Krishnan (@varunkrish) October 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)