Ruled Out Of IPL 2025: पंजाब किंग्ज (पीबीकेएस) चा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या चालू हंगामात लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या बाहेर पडण्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान, फर्ग्युसनने सहाव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या कंबरेखालील त्याला वेदना जाणवू लागल्या. दुखापीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर त्याने पुन्हा गोलंदाजी केली नाही.
लॉकी फर्ग्युसन आयपीएलमधून बाहेर
🚨 LOCKIE FERGUSON RULED OUT OF IPL 2025 DUE TO AN INJURY. 🚨 pic.twitter.com/emaOynwO16
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)