उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये गुरुवारी मंदिराच्या वरच्या चोराबाड़ी तालकडे मोठे हिमस्खलन झाले. हिमस्खलनानंतर सुमारे 5 मिनिटे बर्फाचा धूर दिसत होता. बर्फाच्या धुराचे लोट उठताना पाहून प्रचंड गोंधळ उडाला, मात्र दर्शन चालूच होते. केदारनाथपासून चार किमी अंतरावर ही घटना घडल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. हिमालयात ही एक सामान्य घटना आहे. या हिमस्खलनामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून येथील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात नवीन बर्फ साचत असून, त्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या हिमस्खलनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Monsoon Update: आनंदाची बातमी, मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच राज्यात लावणार हजेरी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)