भारतामध्ये घाऊक किंमत आधारित महागाई  दर ऑगस्ट महिन्यात  -0.52% असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या देशात सलग पाचव्या महिन्यामध्ये WPI Inflation हे निगेटिव्ह राहिले आहे. एप्रिल महिन्यापासून हा महागाई दर निगेटिव्ह राहिला आहे.  मागील जुलै महिन्यात तो -1.36  होता. अन्नधान्याच्या महागाईचा दर जुलैमध्ये 1.32 टक्क्यांच्या तुलनेत 14.25 टक्क्यांवर पोहोचला होता. WPI महागाई ऑगस्टमध्ये -0.52% या  5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. खनिज तेल, मूलभूत धातू, रासायनिक आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थांच्या किमती मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत घसरल्याने हा परिणाम झाल्याची माहिती भारत सरकार कडून देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)