मी नारायण राणे यांच्या विधानाचे समर्थन करत नाही. परंतु जर त्यांना अटक केली गेली किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले गेले, तर एक घटनात्मक अधिकारी असलेल्या राज्यपालांच्या विरोधात टिप्पणी करणाऱ्या इतर नेत्यांचे काय?' अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्याविरोधातील अटक वॉरंट हे दर्शवते की, महाविकासआघाडी सरकार घाबरत आहे. हे एक राजकीय शत्रुत्व आहे, असेही ते म्हणाले.
The arrest warrant against Narayan Rane shows that the MVA govt is scared. This is a political rivalry: Maharashtra BJP chief Chandrakant Patil
— ANI (@ANI) August 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)