आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील डॉक्टर रावली यांनी प्रसंगावधान राखून सीपीआर देऊन सहा वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे ही प्रक्रिया कोणत्याही रुग्णालयात नाही तर, रस्त्यावर पार पडली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, विजयवाडा येथील अयप्पा नगरमध्ये साई नावाचा मुलगा रस्त्यावर विजेचा धक्का लागून बेशुद्ध झाला होता. विजेचा झटका इतका जोरदार होता की या मुलाचे हृदय बंद पडले होते. मुलाचे पालक मुलाला उठवण्याचा प्रयत्न करत असताना, तिथून जात असलेल्या डॉ. रावली मुलाच्या मदतीला सरसावल्या. त्यांनी ताबडतोब मुलावर सीपीआर प्रक्रिया सुरु केली. सीपीआर देण्यास सुरुवात केल्यानंतर सात ते आठ मिनिटांनी मुलाने हालचाल सुरु केली. त्यानंतर साईला रुग्णालयात नेण्यात आले व आवश्यक उपचार देण्यात आले. रुग्णालयात उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला. त्याला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले व नंतर डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. डॉ रावली यांच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (हेही वाचा: House Collapses During Heavy Rain In Madurai: तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस; घराचे छत कोसळून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)