आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चंद्रगिरी झोनजवळील पुथलपट्टू-नायडुपेटा रोडची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेल गळतीमुळे चालत्या कारला आग लागली. या कारमध्ये एकूण 8 जण होते. आग इतकी वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उर्वरित तीन जणांना गंभीररित्या जळलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे आणखी एकाचा मृत्यू झाला. इतर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)