आंध्र प्रदेशात पाऊस आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे तर आणखी 10 लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारने सोमवारी ही माहिती दिली. चित्तूर, अनंतपुरमु, कडप्पा आणि एसपीएस नेल्लोर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर विधानसभेत निवेदन करताना, कृषी मंत्री के कन्ना बाबू म्हणाले की 34 मृतांमध्ये बचाव पथकातील तीन सदस्यांचा समावेश आहे. मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. बचावकार्यात मृत्युमुखी पडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल.
The death toll in rain and flood-related incidents in Andhra Pradesh touched 34 while 10 more people still remained untraced: State government
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)