Andhra Pradesh Elections 2024 Results: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या ट्रेंडनुसार एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षाने (टीडीपी) पुनरागमन केले आहे. त्यामुळे पक्षाच्या मुख्यालयात जल्लोष सुरू झाला आहे. यासोबतच नायडू 9 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तेलगू देसमने दोन जागा जिंकल्या असून, 130 जागांवर आघाडीवर आहे. तसेच जनसेना पक्षाने एक जागा जिंकली असून 19 जागांवर आघाडीवर आहे. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआरसीपी 16 जागांवर तर भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. अशाप्रकारे नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशातील सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. 74 वर्षीय नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसह विधानसभेसाठी मतदान झाले. वायएसआरसीपीने एकट्याने सर्व 174 जागा लढवल्या, तर टीडीपीने 144 जागांवर उमेदवार उभे केले. पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाने (जेएसपी) 21 तर भाजपने 10 जागांवर निवडणूक लढवली. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: इंदूरमध्ये NOTA बटणाचा नवा विक्रम; तब्बल 1.9 लाखांहून अधिक लोकांनी दिले मत)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)