Andhra Pradesh: सापासोबत सेल्फीच्या क्रेझने आंध्र प्रदेशात एका तरुणाचा जीव घेतला आहे. पोट्टीश्रीरामुलू नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर शहरात ही घटना घडली. शहरात ज्यूसचे दुकान चालवणाऱ्या मणिकंथा रेड्डी यांनी सापासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला पण सापाने हल्ला केल्याने त्याचा जीव गेला. TOI मधील एका वृत्तानुसार, एक सर्पमित्र ज्यूसच्या दुकानात आला आणि त्याने मणिकंथाला सांगितले की, त्याच्याकडे साप आहेत, जे निरुपद्रवी आहेत कारण त्याचे फॅंग्स काढलेले आहे. त्यानंतर, त्याने सर्पमित्राला सापासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली.

सापाने सर्पमित्राला इजा न केल्याने मणिकांतनेही हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, मात्र साप त्याच्या उजव्या हाताला चावला. मात्र, सर्पमित्राला साप चावल्याबद्दल विचारले असता, सर्पमित्राने त्याला आश्‍वासन दिले की, तो निरुपद्रवी साप आहे, कारण त्याचे फॅंग्स  एक दिवसापूर्वीच काढले गेले आहेत. मात्र नंतर तरुणाला त्रास होऊ लागला, स्थानिकांनी त्याला ओंगोले-सरकारी सामान्य रुग्णालयात हलवले तरी बुधवारी पहाटे तरुणाने अखेरचा श्वास घेतला. आरोपी सर्पमित्र सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)