विधी आयोगाने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या वयाबाबत कायदा मंत्रालयाकडे आपली सूचना पाठवली आहे. आयोगाने मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत संमतीने सेक्स करण्याचे वय 18 वर्षावरून 16 वर्षे न करण्याची शिफारस सादर केली आहे. याबाबतचे निर्णय न्यायाधीशांच्या विवेकावर सोडले पाहिजे, असे कायदा आयोगाचे म्हणणे आहे. असे संबंध प्रस्थापित करण्यासाठी 18 वर्षे वयाची छेडछाड करण्याची गरज नाही, असे आयोगाचे ठाम मत आहे. जर तसे झाल्यास कायद्याचा गैरवापर वाढू शकतो, असे आयोगाने म्हटले आहे. मात्र विधी आयोगाने संमतीने शारीरिक संबंधांच्याबाबतीत, POCSO कायद्यात काही सुधारणांची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. विधी आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय 18 वर्षे ठेवण्यात आले आहे. आता या सूचनेवर सरकार काय निर्णय घेते हे पाहायचे आहे. (हेही वाचा: Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बनले कायदा; राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी दिली मंजुरी)
The Law Commission advised against changing the current age of consent from 18 to 16 under the Protection of Children from Sexual Offences Act.#LawCommission | @sardakanu_law https://t.co/QpHZDUf1MQ
— IndiaToday (@IndiaToday) September 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)