Pocso Act Case Against BJP Worker: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

कर्नाटकातील मंड्या येथील एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक भाजप कार्यकर्ता विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आणि तिच्या कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Pocso Act Case Against BJP Worker: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Photo Credit- X

Pocso Act Case Against BJP Worker: एका महिलेने तिच्या 12 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आणि तिच्या कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ताविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्ता मंड्या येथील ग्रामपंचायतीतील माजी अध्यक्ष आहे. रमेश असे भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे, महिलेच्या अनुपस्थितीत तिच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेत रमेशसह अन्य तिघे जण होते. तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक छळ, प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी धमकावणे यासंबंधी भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांतर्गत आरोपी भाजप कार्यकर्त्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता, 2012 च्या लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा, तसेच SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत तरतुदींचा समावेश आहे. (Mumbai: सूरतमधील व्यक्ती 14 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली; पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2024 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).