भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी अनेक उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. हरियाणामध्ये फोगाट कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिसांकडून सारी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आम्ही गरज असल्यास हे प्रकरण सीबीआय कडे सुपूर्त करण्यासाठी नक्की सहकार्य करू असं म्हटलं आहे. तसेच हरियाणा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्यांना कसून तपास केला जाईल याची ग्वाही देण्यात आल्याचंही सावंत म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | "After all formalities today, if required, will give this case to CBI": Goa CM Pramod Sawant on Sonali Phogat murder case pic.twitter.com/78y0kylEOq
— ANI (@ANI) August 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)