तालिबानच्या आगमनानंतर अफगाणिस्तानमध्ये अशांतता सुरू झाली आहे. आता शुक्रवारी इथे शिया समुदायाला लक्ष्य करत मोठा स्फोट करण्यात आला. या स्फोटामध्ये सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजन जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मशिदीमध्ये सर्वत्र लोकांच्या शरीराचे तुकडे पसरलेले होते. प्रशासकीय पातळीवरून मृतांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांतातील शिया समुदायाशी संबंधित असलेल्या एका मशिदीमध्ये हा स्फोट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)