ग्रेटर नोएडा ईस्टर्न पेरिफेरल हायवेवर शुक्रवारी पहाटे बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की बसचे मोठे नुकसान झाले. कसना निरीक्षक आणि पोलिसांच्या पथकाने अथक परिश्रमानंतर बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 28 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितले की, 'आज पंजाबहून बिहारला जाणारी बस आणि ट्रकचा कसना पोलिस स्टेशन हद्दीतील लाडपुरा गावात ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर पलवलकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)