मणिपूर मधील हिंसाचारावरुन देशभरातील मोदी सरकार विरोधक एकत्र आले आहे. आगामी लोकसभा निवडणूकांसाठी त्यांनी एकत्र येत त्यांच्या एकजूटीला INDIA असं नाव दिले आहे. आता या इंडिया चे काही खासदार येत्या 29-30 जुलै दिवशी मणिपूरच्या दौर्यावर जाणार आहेत. मीडीया रिपोर्ट्स नुसार ते मणिपूरच्या हिंसाचार झालेल्या भागाला भेट देणार आहेत. आज खासदारांनी काळे कपडे घालून संसदेत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी भविष्यातील रणनिती देखील ठरवली. नक्की वाचा: No Confidence Motion against Government: लोकसभेमध्ये Congress MP Gaurav Gogoi यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव Om Birla यांनी स्विकारला .
पहा ट्वीट
A team of INDIA alliance MPs to visit Manipur on 29-30 July
— ANI (@ANI) July 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)