Viral Video: एका मोठ्या रुग्णालयात चक्क माकड घुसल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या रुग्णालयात माकड फिरत अतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील असल्याचे समजले आहे. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये मोठ्या आकाराचे माकड फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. माकडाने अतिक्रमण करून रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला. काही कर्मचारी माकडाच्या मागे पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)