Greater Noida: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे मेट्रो महिला कर्मचारीचा दोघांन्ही विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला काम संपवून घरी परतत होती त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेला अडवले. तिचा पाठलाग केला. महिलेची छेडखानी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पीडित महिला घाबरून गेली. या घटनेअंतर्गत धाडस दाखवत पीडित महिलेने पोलिसांना तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या घटनेला 10 दिवस ठांबून ठेवले होते. पीडित महिलेने सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरु केली. या प्रकरणी दनकौर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आहे. (हेही वाचा- आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)