Lucknow: बुधवारी लखनौच्या वजीरगंजमध्ये सायकल चालवत असताना मागून येणाऱ्या बसने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघाताचा थरारक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये बसने त्या व्यक्तीला चिरडल्याचे दिसत आहे. अपघातानंतर, बसचा वेग काही क्षणासाठी कमी झाला, परंतु चालकाने त्या माणसाला तपासण्यासाठी बस थांबवली नाही आणि व्हायरल व्हिडिओनुसार घटनास्थळावरून पळ काढला.
वृत्तानुसार, हा व्हिडिओ वजीरगंज पोलीस स्टेशनच्याच्या हिते सिटी नर्सिंग होमजवळचा आहे. अहवालानुसार, लखनौच्या पुर्वा मायानगर निरालानगर येथील रहिवासी जाहिद हुसैन यांनी वजीरगंज पोलीस स्टेशनला माहिती दिली की, बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा रिजवान काही वैयक्तिक कामासाठी सायकलवरून गेला होता .सिटी स्टेशनजवळ सिटी नर्सिंग होमसमोर बस चालकाने या मुलाला धडक दिली. या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि बसच्या चाकाखाली पडल्याने त्याचे डोके चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यांनी वडिलांच्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे. (हेही वाचा: Dangerous Prank Near Railway in Pakistan: प्रँक म्हणून रेल्वे प्रवाशांवर पाणी उडवणाऱ्या तरुणांना पाकिस्तान पोलिसांनी बदडले)
लखनऊ। वजीरगंज इलाके में साइकिल से जा रहे 40 वर्षीय रिज़वान को रोडवेज बस ने रौंद दिया।
लोगों ने शोर मचाया, लेकिन चालक बस लेकर भाग गया। pic.twitter.com/7yFMwNKrPP
— Mohammad Imran (@ImranTG1) June 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)