Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

जम्मूहून श्रीनगरला जाणारी कार जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू
Photo Credit - x

Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणारी कार जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Srinagar National Highway) रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्यूआरटी रामबन येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तेथे बचाव (Rescue)कार्य सुरू आहे. मात्र बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा :Pune Train Accident: पुण्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण प्लेटफॉर्म आणि रूळांमध्ये अडकला, सुरक्षा रक्षकाने वाचवला जीव ( Watch Video) )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).