काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी कन्याकुमारीमधील (Kanyakumari) सेंट जोसेफ मॅट्रीक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजीर केली. या वर्षाच्या सुरुवातीला देखील राहुल गांधी यांनी या शाळेला भेट दिली होती. याच शाळेमध्ये राहुल गांधी यांना पुश-अपचे चॅलेंज देण्यात आले होते, राहुल गांधींनी ते चॅलेंज स्वीकारले देखील होते. पुन्हा एकदा दिवाळी निमित्त राहुल यांनी या शाळेला भेट दिली, आणि विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना दिसत आहेत.
Interaction and dinner with friends from St. Joseph’s Matric Hr. Sec. School, Mulagumoodu, Kanyakumari (TN). Their visit made Diwali even more special.
This confluence of cultures is our country’s biggest strength and we must preserve it. pic.twitter.com/eNNJfvkYEH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)