गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात लोकांनी आयटीआर फाइल् केले आहेत. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑगस्टपर्यंत 2023-24 या वर्षासाठी दाखल केलेल्या 6.98 कोटी आयटीआर पैकी 6.84 कोटी आयटीआर सत्यापित करण्यात आले. त्याच वेळी, गेल्या महिन्यात 31 जुलैपर्यंत 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी दाखल केलेल्या आयटीआरची एकूण संख्या 6.77 कोटींहून अधिक होती, जे 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेल्या एकूण आयटीआर (5.83 कोटी) पेक्षा 16.1% जास्त आहे. अहवालानुसार, मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 2.45 कोटी पेक्षा जास्त परतावे जारी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)