Meerut Girl Kidnapped By 3 Youths: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका १४ वर्षीय मुलीचं तीन तरुणांनी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.तिघांनी मुलीचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हा व्हिडिओ X वर एकाने पोस्ट केला आहे आणि त्यात मेरठ पोलिसांना टॅग केलं आहे. 14 वर्षीय मुलगी बेपत्ता असून अद्याप तीचा शोध लागला नाही. 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. मेरठ पोलिसांनी या प्रकरणात दखल घेत लोहिया पोलिस ठाण्यात तिघांविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. मोहित, निक्की आणि सिकंदर असं आरोपीचे नाव आहे. मेरठ पोलिसांनी पथके तयार करुन या प्रकरणी मुलीचा तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)