गुजरातमध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी रास-गरबाचे आयोजनही केले जाते. नवरात्रीनिमित्त वडोदरा येथेही रास-गरब्याचे आयोजन सुरू झाले आहे. दरम्यान, वडोदरा येथील डभोई येथे होणाऱ्या नवरात्रीत आदर्श ठेवण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. या निर्णयानुसार गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या भाविंकाना कपाळावर तिळक लावण्याचा सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळात गरब्याला येणाऱ्या सर्व खेळाडूंना कपाळावर तिळक लावावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या गरबा महोत्सवात हिंदूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. तिळक हे सनातन धर्माचे महत्त्वाचे प्रतीक आणि प्रथा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. नवरात्रोत्सवात बिगर हिंदूंना प्रवेश देऊ नये, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यानंतर दर्भावती गरबा महोत्सवाच्या आयोजकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आदर्श घालून दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)