Supreme Court refuses to reschedule NEET-PG 2024: सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; 11 ऑगस्टलाच होणार पेपर

नीट परीक्षेच्या तारखेमध्ये यापूर्वी चार वेळेस आधीच बदल करण्यात आले आहेत. 23 जूनची परीक्षा आता 11 ऑगस्टला होत आहे.

Supreme Court refuses to reschedule NEET-PG 2024: सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; 11  ऑगस्टलाच होणार पेपर
Supreme Court (Photo Credit - Twitter)

सर्वोच्च न्यायालयाने आज (9 ऑगस्ट) नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळेनुसार 11 ऑगस्ट दिवशीच परीक्षा होणार आहे. दिलेल्या परीक्षा केंद्रांवर पोहचणं अनेक विद्यार्थ्यांना कठीण असल्याचं सांगत या परीक्षेला पुढे ढकलण्याची मागणी झाली होती पण ती फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती CJI DY Chandrachud,Justices, JB Pardiwala, Manoj Misra यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. त्यांनी आता 11 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. या परीक्षेची अ‍ॅडमीट कार्ड देखील जारी करण्यात आली आहेत.

नीट परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).