Tamilnadu Video: देशात ठिकठिकाणी होळी सण साजरा केला जात आहे. दरम्यान देशातील अनेक राज्य प्राचीन संस्कृती आणि परंपरेसाठी ओळखले आहे. त्यात तमिळनाडू हे अग्रेसर आहे. तमिळनाडू तेथे साजरा होणारा प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवाशी संबंधित आहे. असाच एक सण म्हणजे कुंडम उत्सव. हा उत्सव सत्यमंगलम, इरोड, तामिळनाडूजवळील बनारी अम्मान मंदिरात आयोजित केला जातो. जिथे हजारो भाविक मंदिरात पूजेसाठी येता. धार्मिकतेनुसार या वेळी पूजेसोबतच भाविक जळत्या  निखाऱ्यावर  चालतात. कुंडम उत्सवाच्या व्हिडीओत दिसल्याप्रमाणे, पुरुषांसोबत महिलाही गरम निखाऱ्यांवर चालत आहेत. यावेळी लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीसही हजर असतात. (हेही वाचा- स्कूटरवरून होळी साजरी करणे मुलींना पडले महागात! पोलिसांनी बजावले 33 हजार रुपयांचे चलन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)