झारखंडमधील सायबर गुन्हेगारांनी राज्यातील सहा जिल्ह्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांचे अधिकृत ओळखपत्र हॅक करून हजारो बनावट शिधापत्रिका जारी केल्या. रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (RCMS) अंतर्गत, सर्व जिल्ह्यांतील पुरवठा अधिकाऱ्यांकडे विभागीय पोर्टलचे आयडी असते, ज्याद्वारे ते नवीन रेशन कार्ड जारी करतात, कार्डचे स्वरूप बदलतात आणि कार्डधारकांची नावे दुरुस्त करतात. सायबर गुन्हेगारांनी या आयडीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला असल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्यालयाने सर्व आरसीएमएस आयडी ब्लॉक केले. या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्याची तयारी सुरू आहे. हेही वाचा Global Captive Centres म्हणते पुढच्या 12 महिन्यांमध्ये निर्माण होणार 3.64 लाख नोकऱ्या- रिपोर्ट
#Cyber criminals in Jharkhand issued thousands of fake ration cards by hacking official IDs of Supply Officers of six districts of the state. pic.twitter.com/rCYyoZzQ9v
— IANS (@ians_india) December 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)