Consumer Court Fines Kolkata Restaurant: बियर (Beer) आणि पाण्या( Water) च्या बाटलीची किंमत सर्व ठिकाणी सारखी असते. मात्र, काही रेस्टॉरंट ग्राहकांकडून जास्त पैसे उकळण्याच्या लालसेपोटी जास्त दर लावतात. कोलकातामधील एका रेस्टॉरंटमध्ये काही ग्राहकांना अशा घटनेला सामोर जावं लागलं. ज्यात, त्यांच्याकडून जास्त किमतींसह सेवा शुल्कही आकारले गेले. त्याविरोधात कारवाई करत ग्राहक न्यायालयाने सोमवारी रेस्टॉरंटला १,५०० रूपयांचा दंड (Fine) ठोठावला. तसेच रेस्टॉरंटला सेवा शुल्क आणि एमआरपीपेक्षा जास्त शुल्क म्हणून ग्राहकाकडून आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. (हेही वाचा :Ahmedabad: क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 29.90 लाखांची फसवणूक, आरोपीचा शोध सुरु)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)