Two Men Attack Dog: उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दोन तरुणांनी एका कुत्र्याला जबर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना सआदतगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गेट जवळ दोन कुत्रे बसले आहे. एक कुत्रा पळून गेला, तर एका कुत्र्याला दोन तरुणांनी काठीने जबर मारहाण करत आहे. कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत झाला आहे. त्याच्या पायाल गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतल्याचे दिसत आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)