Chennai Cyclone News: तमिळनाडू राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला असून चेन्नईत पुरपरिस्थिती झाली आहे. चेन्नईच्या ईस्ट कोस्टल रोड येथील कनाथूर परिसरात आज सकाळी नव्याने बांधलेली भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत झारखंडचे रहिवासी होते. कनाथूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. चेन्नईच्या अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
#WATCH | Tamil Nadu | Amid heavy rainfall accompanied by gusty winds, a newly constructed wall collapsed in the Kanathur area, East Coastal Road, Chennai, this morning. Two people died and one was critically injured in this incident. The deceased are residents of Jharkhand.… pic.twitter.com/smFC6i69Sz
— ANI (@ANI) December 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)