Bengluru Video: बेंगळूरूमधील एका बसमध्ये  तिकीटच्या पैश्यावरून धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तिकीटच्या पैश्यावरून प्रवाशी महिला आणि बसमधील कंडक्टर यांच्यात सुरुवातीला वाद झाला त्यानंतर वादाने मारामारी रुपांतर झाले.महिलाने कंडक्टरला कानाखाली लगावल्यानंतर संतापलेल्या कंडक्टरने महिलेला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना जयनगर परिसरातील सिद्धापुरा पोलीस स्टेशनजवळ घडली होती. घटनेनंतर कंडक्टरला कामावरून निलंबित केले. मागे बसलेल्या एका प्रवाश्याने हा व्हिडिओ फोन मध्ये रेकॉर्ड केला. या संतापजनक प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- खोडकर माकडाने हिसकावला चष्मा, पुढे माकडाने जे केले ते पाहून बसेल धक्का

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)