Chhattisgarh New CM: भाजपचे आदिवासी नेते विष्णू देव साई (Vishnu Deo Sai) यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री (Chhattisgarh Chief Minister) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) भाजपने विजय मिळवला होता आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव करून राज्यात कमळ खुलवले. 2018 मध्ये काँग्रेसने विजय मिळवण्यापूर्वी राज्यात भाजपची 15 वर्षांची सत्ता होती. तथापि, छत्तीसगडमध्ये भाजप विजयी झाल्यामुळे काँग्रेसला राज्य राखता आले नाही. 90 सदस्यीय विधानसभेच्या सभागृहात भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या 35 जागांच्या तुलनेत 54 जागा जिंकून आरामात विजय मिळवला. (हेही वाचा - Telangana Govt Mahalaxmi Scheme: सार्वजनिक वाहतूक सेवेत महिलांना मोफत प्रवास, आरोग्य विमा कवच योजना मर्यादेतही 10 लाख रुपयांपर्यंतची वाढ; सत्तेत येताच काँग्रेस सरकारचा तेलंगणात महत्त्वपूर्ण निर्णय)
BREAKING NEWS
BJP appoints Vishnu Deo Sai as next Chief Minister of Chhattisgarh.
He is from tribal community.#ChhattisgarhCM pic.twitter.com/sso8IziCJl
— रीतेश मिश्रा (@Ritesh_Mishraaa) December 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)