Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका निवृत्त सैनिकाने तिघांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेकच्या महाराजपूरा पोलिस स्टेशन हद्दीतील रसूलपूर परिसरात ही घटना घडली. विजेच्या तारा लावण्यावरून वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, यात निवृत्त सैनिकाने गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी सद्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधात आहेत. (हेही वाचा- ब्रेक फेल होऊन लिफ्ट थेट छताला धडकली; नोएडा येथील विचित्र आपघातात 3 जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)