Rinku Singh Gets Engaged to MP Priya Saroj: टीम इंडियाचा फलंदाज रिंकू सिंगने यूपीच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केला आहे. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. सध्या सोशल मिडियावर याची चर्चा आहे. येत्या 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी रिंकू सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. डावखुरा फलंदाज रिंकू सिंग गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. प्रिया सरोजबद्दल सांगायचे तर, वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्या खासदार झाल्या होत्या. प्रिया सरोज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील मच्छिलिशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत.
दुसरीकडे, रिंकूची टी-20 फॉरमॅटमध्ये कामगिरी अप्रतिम राहिली आहे. रिंकू सिंगने टीम इंडियासाठी 30 टी-20 सामन्यांमध्ये 46 पेक्षा जास्त सरासरीने 507 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 160 पेक्षा जास्त आहे. रिंकूने टीम इंडियासाठी 2 वनडे सामनेही खेळले आहेत. याशिवाय रिंकू सिंग हा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा महत्त्वाचा भाग आहे. रिंकू सिंगला आयपीएल 2025 साठी कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवले होते. (हेही वाचा: New Guidelines For Team India Players: ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर BCCI ने घेतली कठोर भूमिका; खेळाडूंसाठी नवे नियम लागू, क्रिकेटपटूंच्या पत्नींचा दौऱ्यातील कालावधी झाला कमी)
Rinku Singh Gets Engaged to MP Priya Saroj:
Rinku Singh gets engaged to Samajwadi Party MP Priya Saroj. 💍
- Many congratulations to them! ❤️ pic.twitter.com/7b7Hb0D2Em
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
Rinku Singh Engagement: रिंकू सिंह ने समाजवादी पार्टी की सांसद से की सगाई, जानें कौन बनेगी क्रिकेटर की दुल्हनिया?#RinkuSinghEngagement #NewsUpdatehttps://t.co/tNHDRFexmL
— News State UP & UK (@NewsStateHindi) January 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)