Delhi Firecrackers Ban: दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्लीतील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत दिवाळीत होणाऱ्या वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. दरम्यान, पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, राजधानीत फटाके फोडणे आणि खरेदी केल्यास 200 रुपये दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागणार आहे.

दरवर्षी दिवाळीपासूनच शहरातील हवेची पातळी खूपच खराब होते. त्यामुळे दिल्ली सरकार आतापासूनच तयारीत व्यस्त आहे. तत्पूर्वी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राय म्हणाले, "धूळ प्रदूषण रोखण्यासाठी आणि पुसा बायो-डिकंपोजर शिंपडण्याच्या मोहिमेव्यतिरिक्त, आम्ही दिवाळीच्या दिवशी वायू प्रदूषण नियंत्रित करण्याच्या योजनेवर काम करत आहोत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)